ताज्या घडामोडीराजकारण

नगरपालिका निवडणुकीत भाजपची घराणेशाही उघड

राष्ट्रवादीचे प्रवक्ते रविकांत वर्पे यांची टीका

मुंबई ! पीपल बाईट

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपकडून देण्यात आलेली उमेदवारी आता चर्चेचा विषय ठरली आहे. पार्टी विथ डिफरन्स आणि राष्ट्र प्रथम अशी घोषणा देणाऱ्या भाजपने पुण्यासह राज्यातील विविध ठिकाणी नगराध्यक्ष, नगरसेवक आणि नगरपरिषदेतील पदांसाठी आपल्या नेत्यांच्या नातेवाईकांना उमेदवारी देत घराणेशाहीला खुली पाठराखण केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश प्रवक्ते रविकांत वर्पे यांनी प्रसिद्धीपत्रकात केला.

वर्पे यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे, जामनेरचे उमेदवार मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी, भुसावळचे उमेदवार मंत्री संजय सावकारे यांच्या पत्नी, खामगावचे उमेदवार मंत्री आकाश फुंडकर यांच्या वहिनी, दौंडाई येथील मंत्री जयकुमार रावल यांच्या आई, यासह अनेक नेत्यांचा समावेश आहे. “भाजपने दिलेल्या या उमेदवारी पाहिल्यास हे स्पष्ट होते की खरी निवडणूक सुरू होण्याआधीच घराणेशाहीची स्पर्धा सुरू झाली आहे. कॉंग्रेसवर आरोप करायची, तीच कामे भाजप करत आहे, अशी टीका वर्पे यांनी केली.

स्थानिक आरोग्य संस्थांच्या निवडणुका लांबल्या असताना भाजपच्या या निर्णयामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असून, काही ठिकाणी पाणीपुरवठा, गटारे, रस्ते यांसारख्या समस्यांकडे दुर्लक्ष करून स्वतःच्या कुंटुंबीयांना पुढे आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे वर्पे म्हणाले. फडणवीस यांच्या होकाराशिवाय ही उमेदवारी जाहीर झाली असती का, असा सवाल करत वर्पे म्हणाले की, राष्ट्रहितासाठी डोळे मिटून घेतलेल्या भाजपने या उमेदवारांना मान्यता दिली आहे. मग भाजपचा ‘कौटुंबिक सोहळा’ सुरू आहे का?”भाजपची घराणेशाही उघड झाली असून, यावर बोलण्याची नैतिकताही त्यांच्यात उरलेली नाही,” अशा शब्दांत राष्ट्रवादीचे प्रवक्ते रविकांत वर्पे यांनी टीका केली.

—————

बातमीसाठी संपर्क : 8329525643