पुण्यात राष्ट्रवादीच्या जागावाटपावर अंतिम टप्प्यात चर्चा
– उपमुख्यमंत्री अजित पवार १२५, खासदार शरद पवारांचा पक्ष ४० जागांवर लढण्याचा प्राथमिक अंदाज
पुणे : पीपल बाईट
पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन्ही गटांमध्ये जागावाटपावरून सुरू असलेली चर्चा आता निर्णायक टप्प्यात पोहोचली आहे. प्राथमिक अंदाजानुसार अजित पवार गट सुमारे १२५ जागांवर तर शरद पवार गट सुमारे ४० जागांवर निवडणूक लढवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने दिवसभरात राजकीय चित्र अधिक स्पष्ट होण्याची चिन्हे आहेत. दरम्यान आज सकाळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष (पूर्व) माजी आमदार सुनील टिंगरे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अंकुश काकडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली असून चर्चा सुरू आहे.
पुण्यात दोन्ही गटांच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये बैठका व चर्चांना वेग आला आहे. अनेक इच्छुक उमेदवारांची धाकधूक वाढली असून अंतिम क्षणी नाव जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काही प्रभागांमध्ये अद्यापही तिढा कायम असल्याने शेवटच्या क्षणापर्यंत फोनाफोनी आणि वाटाघाटी सुरू राहण्याची शक्यता आहे.
आज अर्ज भरण्याची अंतिम मुदत असल्यामुळे पुण्यातील राजकीय हालचालींना मोठे महत्त्व आले आहे. संध्याकाळपर्यंत राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचे उमेदवार स्पष्ट होतील आणि त्यानंतरच पुण्यातील निवडणूक रणधुमाळीला खऱ्या अर्थाने सुरुवात होणार आहे.
——————–
बातमीसाठी संपर्क : 8329525643

