ताज्या घडामोडी

नगरपरिषदा-नगरपंचायतींची मतमोजणी आता २१ डिसेंबरला

नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई ! पीपल बाईट

नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांची मतमोजणी आता ३ डिसेंबरऐवजी २१ डिसेंबर रोजी होणार आहे. नागपूर येथील हायकोर्टाच्या खंडपीठाने दिलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयानंतर राज्य निवडणूक आयोगाने ही सुधारित तारीख जाहीर केली.

राज्यात विविध स्तरांवरील निवडणुका सुरू असल्याने ३ डिसेंबरला नियोजित असलेली मतमोजणी इतर निवडणूक प्रक्रियेशी संघर्ष करू शकते, अशी याचिकाकर्त्यांची बाजू होती. न्यायालयानेही त्यास मान्यता देत मतमोजणी पुढे ढकलण्याचा आदेश दिला.मुख्य निकाल असा की, एका मतमोजणीच्या प्रक्रियेचा दबाव इतर ठिकाणी सुरू असलेल्या निवडणुकांवर पडू नये. त्यामुळे आता २१ डिसेंबर रोजी राज्यातील सर्व नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या मतमोजणी प्रक्रिया एकाच दिवशी पार पडणार आहे. एक्सिट पोल देखील दाखवता येणार नाही. या निर्णयामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निकालाची प्रतीक्षा वाढली आहे.

—————

बातमीसाठी संपर्क : 8329525643