ग्राउंड रिपोर्ट

ॲड. आम्रपाली धिवार यांचा होम टू होम प्रचार !

– प्रभाग क्रमांक दोन मधील नागरिकांचा वाढता प्रतिसाद

पुणे ! पीपल बाईट

पुणे महापालिका प्रभाग क्रमांक दोन मध्ये उच्‍च शिक्षित उमेदवार ॲड. आम्रपाली धिवार यांनी होम टू होम प्रचारावर भर दिला आहे. नागरिकांना प्रत्‍यक्ष भेटून त्‍यांच्‍याकडून आणि समर्थकांकडून कामाचा अहवाल दिला जात आहे. अहवालातून प्रभाग क्रमांक दोनच्‍या विकासाचे व्‍हीजन तसेच केलेल्‍या कामांची शिदोरी त्‍यांचे समर्थक मांडत आहेत. त्‍यांच्‍या या कामाची दखल घेत नागरिकांकडून देखील भरघोस प्रतिसाद मिळत आहे.

पुणे महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम लवकर जाहिर होण्याची शक्‍यता आहे. सध्या मतदार यादीचे काम सुरू आहे. २७ डिसेंबर रोजी अंतिम यादी प्रसिद्ध होईल. या पार्श्वभूमीवर उमेदवार कामाला लागले आहेत. प्रभाग क्रमांक दोन मध्ये महिला मागास प्रवर्गातून उच्‍च शिक्षित असलेल्‍या ॲड. आम्रपाली धिवार यांच्‍या नावाची चर्चा होत आहे. त्‍यांनी हिंतचिंतकांच्‍या बळावर प्रभागात आपल्‍या प्रचाराची गती वाढवली आहे. नागपूर चाळ, जाधवनगर, महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड या भागात सध्या त्‍यांनी आणि त्‍यांच्‍या समर्थकांनी प्रत्‍येक घरोघरी जात आपली भूमिका सांगण्याचा सपाटा सुरू ठेवला आहे.

ॲड. आम्रपाली धिवार यांनी माथाडी कामगार, पीएमपीएमएल कर्मचारी, आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचारी, चंद्रमानगर वसाहतीमधील नागरिकांचे प्रश्‍न, प्रभागातील महापालिका शाळांचे प्रश्‍न, गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्‍य वाटप आदी कामे केली आहेत. वकिली क्षेत्रात कार्यरत असल्‍याने त्‍याच्‍या माध्यमातून त्‍यांनी अनेकांना कायदेशीर न्‍याय देण्याचा प्रयत्‍न केला आहे. त्‍या कामाच्‍या जोरावर त्‍यांनी आपल्‍या शिक्षणाचा उपयोग प्रभागाच्‍या विकासासाठी करण्याचा निर्धार केला आहे. त्‍यामधून त्‍यांनी आपल्‍या प्रचाराला सुरूवात केली आहे. 

आगामी काळात त्‍यांना प्रस्‍थापित राजकीय पक्षाकडून संधी मिळाल्‍यास त्‍याचा लाभ त्‍यांना आणि संबंधीत राजकीय पक्षाला होईल, असे राजकीय जाणकार सांगत आहेत.
——————

बातमीसाठी संपर्क : ८३२९५२५६४३